कोंकणात

| Labels: | Posted On 1/8/09 at 2:10 AM







पाय वाट
वाडी दाट
अन् पहाट
कोंकणात

झाड माड
रान वेड
अन् रहाट
कोंकणात

पान फुल
नवी झूल
झाडावर
कोंकणात

चंद्रमौळी
रिपरिप
माडीवर
कोंकणात

प्रेम माया
गाणी ओव्या
अन् अभंग
कोंकणात

शांत चित्त
चित्त तॄप्त
मना संग
कोंकणात

-
ऍडी जोशी