लिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II