प्रेमाचे लोणचे
| Labels: ऍडी उवाच | Posted On 9/12/08 at 5:06 PM
पाहताच तुज डोळे भरूनी, मन ओथंबूनी गेले,
चित्त राहिले न थार्यावर, मन निसटूनी गेले.
जसे दवबिंदू वेली फुलांवर, नेत्र तुझे भासले,
ध्यान धरीतो तुझे लोचनी, जीवन तुज वाहिले.
कांती तुझी मज टाकी मोहूनी, चंद्रासही लाजवे,
एक आगळी वीज अनामीक, केसांतुनी सळसळे.
लिहू किती मी तुजवर ओळी, भान न मज राहिले,
वाळली शाई ह्या बोटांवर, कागदही संपले.
(आता काव्यातून सत्यात येउया)
भाऊ तुझा गं देई धमक्या, पाहूनी मज गुरगुरे,
काय करावे आता आपण, काही मज न कळे.
रात्री तो भेटे गुत्त्यावर, देई धडे नितीचे,
दिसतो आणिक किती भयानक, सावट हे भितीचे.
परी न हरलो, नाही थांबलो, प्रेम केले मी खरे,
भाऊ तुझा का मधे कडमडे, प्रश्न एकची उरे.
धरले एका रम्य सकाळी, मला तुला बघताना,
दिवस कसा तो गेला निघूनी, भग्न हाडे मोजताना.
उतरली धुंदी तव प्रेमाची, शुद्ध ही आली मजसी,
पुन्हा प्रेम हे करणे नाही, भाऊ असणारीशी.

हाहाहा....
एकदम ती किशोर प्रधान यांची डास मारणार्या यंत्राची जाहिरात (ब्रँड आठवत नाही. :( ) आठवली. डासामुळे झोपमोड आणि स्वप्नभंग....
असो.
>>पुन्हा प्रेम हे करणे नाही, भाऊ असणारीशी<<
खरंय, उगाच "निन्न हल्लु मुडितिनी" म्हणायचा.... आणि कदाचित तसं execute सुद्धा करेल ....
sollid
"आवडलेले थोडे काही" या संवेदने सुरू केलेल्या कवितांच्या खॊ-खो च्या खेळात सहभागी झालो व तुम्हाला खॊ दिलाय पहा.
chhan, he avadala, he realistic vatala. :)