रँडम जोक

| | Posted On 11/12/10 at 8:36 PM

एकदा मध्यरात्री एका घरात चोर शिरतो. नवरा-बायको झोपलेले असतात. नवर्‍याच्या घोरण्यामुळे बायकोची झोप चाळवते आणि तिला कपाट उघडायचा प्रयत्न करणारा चोर दिसतो.

ती आरडाओरडा करणार इतक्यात चोर तिच्या तोंडत बोळा कोंबतो, तिचे हात-पाय बांधतो आणि कामाला लागतो.

खुडबुड ऐकून नवर्‍याला जाग येते. तो डोळे किलकिले करून बघतो तर बायको तोंडात बोळा आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत आहे आणि चोर कपाटातलं सामान बॅगेत भरतोय.

ते बघून नवरा चोराला म्हणतो "बाबा रे, तुला काय हवं ते घेऊन जा. पण कॄपा करून हिच्या तोंडातला बोळा नको काढूस."


- आदि जोशी

Comments:

There are 0 comments for रँडम जोक