अरेरे तुझे काय झाले हे जोश्या
| | Posted On 5/27/11 at 11:40 PM
हे आमचे मनाचे श्लोक. शेवटच्या कडव्यातल्या शेवटच्या वाक्याशी बायको सहमत आहे.
अरेरे तुझे काय झाले हे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
कुर्हाडीवरी पाय मारोनी घेशी,
तरी दात वेंगाडुनी हसतोस जोश्या.
अशी बुद्धी तू टाकली का गहाण,
कपाळावरी मारुनी घे वहाण.
उपयोग त्याचा परी शुन्य जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
पाजी जगाला जो बुद्धीचे डोस,
करी देव पोपट त्याचाच खास.
स्वतःहून खड्ड्यात पडलास जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
सगे सोयरे मग्न पार्टीत खास,
मनी हासती ते तुझ्या धाडसास.
इथे वाट परतीची नसते रे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
जरा आठवी तो दिवस तू भयाण,
जगाच्या समक्ष तुझे शीरकाण.
अजाच्या गळी माळ पडली रे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
कशी घोडचूक ही केलीस छान,
स्वतः खाटीका हाती देतोस मान.
असा बुद्धीभेद तुझा होई जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
पुन्हा पारतंत्र्यात गेलास जोश्या,
विनाशर्त शरणागत झालास जोश्या,
तुझी लावली तू स्वतः वाट जोश्या,
कसा मूर्ख, बिंडोक आहेस जोश्या.
-------------------------------------------समाप्तच-------------------------------------------
अरेरे तुझे काय झाले हे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
कुर्हाडीवरी पाय मारोनी घेशी,
तरी दात वेंगाडुनी हसतोस जोश्या.
अशी बुद्धी तू टाकली का गहाण,
कपाळावरी मारुनी घे वहाण.
उपयोग त्याचा परी शुन्य जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
पाजी जगाला जो बुद्धीचे डोस,
करी देव पोपट त्याचाच खास.
स्वतःहून खड्ड्यात पडलास जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
सगे सोयरे मग्न पार्टीत खास,
मनी हासती ते तुझ्या धाडसास.
इथे वाट परतीची नसते रे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
जरा आठवी तो दिवस तू भयाण,
जगाच्या समक्ष तुझे शीरकाण.
अजाच्या गळी माळ पडली रे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
कशी घोडचूक ही केलीस छान,
स्वतः खाटीका हाती देतोस मान.
असा बुद्धीभेद तुझा होई जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
पुन्हा पारतंत्र्यात गेलास जोश्या,
विनाशर्त शरणागत झालास जोश्या,
तुझी लावली तू स्वतः वाट जोश्या,
कसा मूर्ख, बिंडोक आहेस जोश्या.
-------------------------------------------समाप्तच-------------------------------------------
=))
:D:D:D
उशिरा का होइना पण स्वत:ची चुक लक्षात आली म्हणायची तुझ्या.
आपला,
(तुझ्यासारखाच फसलेला) अनिकेत वैद्य.
ह्म्म्म्म्म्म्म्म्म! :( ????! काय कळत नाही! हसावे की नाही! हसणेचं जास्त ठीक..........:P! =)))))
हा हा हा ;-)
सावर रे .... :D
Sahi.... :)
हा हा हा ;-)
अरेरे ! तुझे काय झाले हे जोश्या !!
लग्न हे केलेची पाहिजे... स्वातंत्र हेची सर्वस्व नाही
सर्वांचे आभार आमच्या दु:खावर हसल्याबद्दल :-)
सॉरी! आदित्य ! तुमच्या दुःखावर नाही हसले, पण तुमचे ओघवते लेखन मला खूप आवडते. म्हणून! :(
@ Mohinee
अहो माझी कॉमेंट सिरियसली घेऊ नका
samapt'ch' :D
Bharich :)
haha
aho shloka madhye ovya astat vakya nastat! :)
तुमचे दु:ख बघून अगदी ..........भारावून गेले,
आपले समदु:खी बंधू अखिल ब्रह्मांड पत्नी शोषित महासभा फेसबुक इथे कार्यरत आहेत.
या सभेत आपल्याला हार्दिक निमंत्रण आहे.
http://www.facebook.com/groups/105459729547355.
आमच्यासारखे तुमचे हितशत्रू महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी तिथेही आहेतच.
खरंच मनापासून आमंत्रण! :)
ही ही :D ह्यावर सौंची काय reaction होती?
खूप छान!!