दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

| | Posted On 11/4/10 at 2:37 PM

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,


तुम्हा सर्वांना आणि तुमच्या आप्त-स्वकियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही दिवाळी आणि येणारे वर्ष तुम्हा सर्वांना सुख-समॄद्धीचे, भरभराटीचे, कमी खर्चाचे, पगार वाढण्याचे, मुलांच्या फिया न वाढण्याचे, सासरच्या कमी फेर्‍या होण्याचे, बायकोकडून कमी टोमणे खाण्याचे, लग्नाच्या जेवणाची वारंवार आमंत्रणं येण्याचे, कामवाल्या बाईच्या कमी सुट्ट्यांचे आणि तुम्हाला ऑफिसमधून सुट्ट्या मिळण्याचे, पेट्रोलचे भाव न वाढण्याचे, वेळेवर गॅस येण्याचे आणि पोटात गॅस न होण्याचे, ट्रेन मधे बसायला जागा मिळण्याचे, बायकोला तुमच्या थापा पटण्याचे / नवर्‍याने कमी थापा मारण्याचे, हवं तिथे, हवं तेव्हा टॅक्सी / रिक्षा सापडण्याचे, वेळी अवेळी कॉलसेंटरचे कॉल न येण्याचे, सेल मधे तुमच्या मापाचे कपडे सापडण्याचे आणि लगेच तुमचे माप न वाढण्याचे, तुमच्या सर्व इच्छा (सुप्त आणि प्रकट) पूर्ण होण्याचे आणि चुकून माकून ब्लॉग लेखक असाल तर ब्लॉग विझीट्स + फॉलोअर्स वाढण्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आपला,


आदि जोशी

Comments:

There are 6 comments for दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा