३ लार्ज

| Labels: | Posted On 4/15/08 at 12:38 PM

क्वार्टर जशी मी ३ लार्ज पेग मधे संपवतो, तशाच ह्या दारुवर लिहीलेल्या कविताही ३ ओळींतच संपवतोय.



दारु उत्तरं देत नाही
अम्हाला इतकंच पुरेसं आहे
ती प्रश्नं विचारत नही


आज काल दारु जास्तं होते आहे
कमी करावी म्हणतो
सोडवीशी वाटू नये म्हणून


दारु नैतीकता शिथील करते
म्हणूनच कदाचीत
जात, पात, वयाच्या भिंती तोडते


जस्तं पिणार्यांना लोकं नावं ठेवतात
मनातल्या मनात मात्रं
त्यांच्या स्टॅमिना वर जळतात


बालमित्र भेटले नी बसूया म्हणाले
बसुन झाल्यावर बालमित्र
आधी सारखे रांगायला लागले


दारु वर लिहीन तितकं कमीच आहे
हे थोडं दारु सारखंच आहे
पिईन तितकी कमीच आहे


पिताना भान रहात नाही
म्हणून पिणं कमी होत नाही
एकदा भान सुटलं की कमी काय नी जास्तं काय


दारु पिउन पोट भरतं मन भरत नाही
थोडी शुद्ध आली की
पुन्हा प्यायल्या शिवाय रहावत नाही


प्यायची इछा होत नाही
असा एकही दिवस जात नाही
रात्र तर नाहीच नाही


थोडासा सोडा चवी पुरता बर्फ
तोंडी लावायला पापड नी चटणी
दारुच्या थालिपीठाची ही खमंग भाजणी


मरणाच्या दारावरही दारु आठवली
यमाला म्हटलं बसुया का
त्याचीही कळी खुलली


आता जरा थांबावसं वाटतंय
कवीता करायचं सोडून
बसावसं वाटतंय



ऍडी म्हणे आता, उरलो झिंगण्या पुरता.

Comments:

There are 5 comments for ३ लार्ज