काही (च्या काही) दारोळ्या

| Labels: | Posted On 3/14/08 at 7:33 PM

बसलो काल,
मित्रा समावेत,
सुर्य उगवला,
बाटली रिकामी.

आधी ढसा-ढस,
मग हळू हळू ,
थेंबाचे महत्व,
आता समजले.

हातावरी रेष,
नशीब वाकडे,
पेग शेवटचा,
सोडा ही संपला.

सकाळ झाली,
डोके दुखतसे,
घसा ही पडला,
ठक्क कोरडा.

ग्लास ही तोच,
पाणी ही ओतले,
पण आता वर,
लिम्बाला पिळले.

आता पिणे नाही,
नक्की ठरवले,
रात्र आली पुन्हा,
बाटली घेउनी.

Comments:

There are 0 comments for काही (च्या काही) दारोळ्या