च्यायला

| Labels: | Posted On 3/28/08 at 11:07 AM

च्यायला ह्या वर्षी पण के.टी. लागली, ओक्टोबर मधे सुटली नाही तर पुढल्या वर्षी संध्या मॅडमच्या वर्गात कसं बसणार?
आज बाबांनी कट्ट्यावर सिग्रेट ओढताना पाहिलं, काही बोलले नाहीत करण तेव्हा ते पण सिग्रेट ओढत होते.


माझ्या बॉस इतका नालायक माणूस मी अख्ख्या आयुष्यात बघितला नव्हता, नंतर माझं लग्नं झालं.


लग्नापूर्वी ऑफिसला जायचा कंटाळा यायचा, आता ऑफिसचा आधार वाटतो.


आज काल सगळीकडे वशिला लागतो, वशिला मिळवण्यासाठी पण.


तिला पहाताच माझ्या मनात विचार आला, ती माझी बायको असती तर मला इतकी सुंदर वटली असती का?


तरी मी तुला सांगत होतो, कुणाचं ऐकू नकोस म्हणून.


आज ट्राफिक पोलीसानी पकडलं, चूक झाली माफ करा म्हाणालो तर म्हणाला चूक झाली म्हणूनच पकडलंय.


सारखं सारखं कट्ट्यावर राहून बाप घरातून हकलेल, मग मी कट्ट्यावर रहायला येइन.


आज काल रात्री झोप येत नाही, म्हणून दिवसाच भरपूर झोपून घेतो.


आमच्या बायकोला खिचडी चांगली बनवता येत नाही, त्यामुळे आमचे उपास सद्ध्या बंद आहेत.


महागाई आणि पगार समप्रमाणात वाढले तर बँका लोन कोणाला देणार.


सद्ध्या सगळेच शिवाजी असल्याने त्यांना जीव ओवाळून टाकणारे मावळे मिळत नाहीत.


उतार वयात शहाणा होणार होतो, पण तेवढ्यात कुठेतरी म्हातारपण हे दुसरं बालपण असल्याचं वाचलं.


अर्धं आयुष्य असंच निघून गेल्यावर काही शि़कलो नाही म्हणून रडायचं की इतकी वर्ष नकळत गेली म्हणून आनंदायचं?

Comments:

There are 2 comments for च्यायला