त्याच्या नी तिच्या चारोळ्या

| Labels: | Posted On 3/14/08 at 7:41 PM

ये ना गड्या घरी,
असे ती म्हणाली,
जेंव्हा तो घरी गेला,
तिने त्याचा खरंच 'गडी ' केला.


प्रेमात कुणाच्या पडायला,
मुर्ख असावं लागतं,
नाहीतर प्रेम कसं घडेल,
आणि तुझ्या प्रेमात कोण पडेल.


नकार द्यायचे १०० मार्ग,
असं पुस्तक मी लिहीणारे,
पहिला नकार तुला दिल्याने,
प्रस्तावना तुझ्याकडून घेणारे.


पहिल्या प्रेमाची पहिली आठवण,
मी खूप जपुन ठेवणारे,
आपल्या पहिल्या जेवणाचं बिल,
मी बरेच महिने भरणारे.


तुझ्या नावाच्या उचक्या,
आता लागत नाहीत,
तुझ्या कार्ड चं बिल भरलंय मी,
आता ते फोन करत नाहीत.

Comments:

There are 0 comments for त्याच्या नी तिच्या चारोळ्या