चुकार चारोळ्या

| Labels: | Posted On 3/14/08 at 7:34 PM

तिला म्हणालो तुझ्या डोळ्यात,
बुडावसं वाटतंय,
ती म्हणाली लाजून,
पोहता येतं का तुला?


मिसळी वर लिम्बू,
ताटा मधे पाव,
सन्गती येउ दे,
कोकम सरबत.


वाढला उन्हाळा,
वाळ्याचे पडदे,
आंब्याच्या झाडाला,
पन्ह्याची तहान.


शेकडो पावसाळे पाहीले,
तरी मी कोरडाच,
शेवटी स्वताला ढग म्हणून,
मनाचं समाधान केलं.


सुट्टी च्या दीवशी,
अन्घोळीला पण सुट्टी,
काराण अन्घोळ केली की,
कपडे ही धुवावे लगतात.

Comments:

There are 0 comments for चुकार चारोळ्या