मन हे नाठाळ

| Labels: | Posted On 3/14/08 at 7:12 PM

मन हे नाठाळ, विचार सुकाळ,

शोधीते सान्गाती, सर्व काळ.


पक्षी निरिक्शण, आवडता छन्द,

पाखरू गोमटे, भावले मनास.


लाजरी बुजरी, गालावर खळी,

पाहताच रूप, मन भरे.


सुन्दर चेहरा, गोरटी काया,

डोळे ही झुरती, बघावया.


कट्ट्यावर बसोनी , केले खोद-काम,

तयारही केला, बायो-डेटा.


ठेवली पाळत, मित्र मदतीला,

काढली महिती, यथा शक्ती.


नसे ती एकटी, बहिण धाकटी,

दिसते सुन्दर, तिच्याहून.


मन हे नाठाळ, पुन्हा गान्गरले,

कुणा मागे जावे, कळेनासे.


मना समजावले, वन बर्ड इन हैन्ड,

इ़ज बेटर दैन दोन, झुडुपामध्धी.


बाइक वरोनी, फिरलो मागो माग,

शोधुनी काढल्या, सगळ्या वेळा.


मग ठरवले, हिला विचरावे,

काय विचारावे, पुन्हा प्रश्न.


येता ती सामोरी, जीभ अडखळे,

उद्या बोलू सगळे, मन म्हणे.


दिवस असेच, गेले किती तरी,

आम्ही कट्ट्यावरी, गुप्-चुप.


मित्र ही त्रासले, विचार म्हणाले,

केली मेहेनत, तुझ्या साठी.


मन न धजले, गप्पच बसले,

करोनी विचार, हुशारीचा.


नाही नोकरी, नाही तुला घर,

हो म्हणाली तर, करा काय.


बाप रागावेल, झोडुनी काढेल,

घेईल मदतीला, तिच्या बापा.


त्याची काय चुक, आम्हीच असे,

घरीच असतो, सर्व काळ.


शेवटी ठरवले, नोकरी शोधावी,

बाकीचे सगळे, होइल आपो-आप.


शोधली नोकरी, घरही घेतले,

मागे वळोनीया, पाहीले नाहीच.


विसरलो तिला, आणि बहिणीला,

लक्श्य हे एकच, सेटल होणे.


एके दिवशी मित्र, घेउनिया आला,

लग्नाची पत्रिका, पाखराच्या.


वाचली पत्रीका, धुर सोडोनिया,

मागवला चहा, सर्वान्साठी.


मनो मनी तिला, केले धन्यवाद,

आणले आयुष्य, मार्गावरी.


आल्या अश्या कैक, गेल्याही तशाच,

अम्ही ही तसेच, कट्ट्यावरी.


असे अम्ही गुन्ग, झालो आयुष्यात,

विसर पाडोनी, सगळ्याचा.


मग अचानक, आली ती सामोरी,

अम्ही पुन्हा गप्प, बोबडी वळोनी.


म्हणाली बघते, रोज तुला इथे,

धूर सोडताना, कट्ट्यावरी.


घेतली मदत, तुझ्याच सख्याची,

बान्धायला बैल, दावणीला.


दोघान्च्या घरी मी , आधी सान्गीतले,

मग रचीयले, कुम्भान्ड हे.


वर्ष झाले आता, आमुच्या लग्नाला,

मान डोलवीतो , नन्दी बैल.


मित्र ते सुटले, कट्टाही तसाच,

हातात पिशवी, दळणाची.


कधी कधी येतो , विचार मनासी,

काय करीतसे, धाकटी बहीण.


कधी कधी येते, कट्ट्याची आठवण,

चहा सिगरेट, खाद्य माझे.


कोण आता बसे, जागेवर माझ्या,

शोधत पाखरू, मित्रान्सन्गे...

Comments:

There are 3 comments for मन हे नाठाळ