पहीला उतारा - काही नीबंध

| Labels: | Posted On 3/16/08 at 6:31 PM

नमस्कार मीत्रहो,
हे लीखाण काही िदवसांपुर्वी घडलेले आहे. लहान मुलांच्या मेंदुत डोकव्ण्याचा हा मझा छोटासा प्रयत्न. मधे इंटर्नेट वर ह्या संधर्भात एक नीबंध झाला होता. तोच वीचर थोडा खेचला आहे.
आपला,
ऍडी जोशी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हैस
मला आधी वाटायाचं भैय्या दूध देतो. पण नंतर कळलं की दूध देणारा खरा प्राणी म्हैस आहे. भैय्या फक्त दूध वाटतो. मी आजीला वीचारलं की म्ह्शीच्या पोटात दूध कोण ओततं ? तर ती देवाला नमस्कार करुन म्हणाली, "काय सांगू बाबा, देवाची करणी, आणी नाराळात पाणी." म्हणजे जसं नारळात पाणी येतं, तसंच म्ह्शीच्या पोटात दूध येतं. पण मी अजुन तरी नारळाच्या झाडा सारखे म्हशीचं झाड़ कुठे पाहीलं नाही.
माझ्या शाळेत पाचवीत शीकणार्या बंड्या दादाचा ह्यावर विश्वास नाही. तो म्हाणाला," म्हैस जन्माला येताना तीच्या पोटात मील्क पावड्र असते. मग ती पाणी पीते आणी दूध देते. बंड्या दादाने अजून पण काही काही शोध लावले आहेत. तो म्हण्तो," मासे समुद्रात शू करतात म्हणून समुद्रचे पाणी खारट आहे. आणी असं अजून बरंच काही काही.
शेजार्च्या गोर्यांची सुमी ताई लग्न होउन गेली होती. ती परत आली तेव्हा तिचा पोट खुप सुज्लं होतं. म्हणून तीला डॉक्टर कड़े घेऊन गेले. तर ती येताना तीच्या सर्खंच एक गुटगुटीत बाळ घेऊन आली. मी तीला वीचारलं," बाळ कुठुन आलं?" तर ती म्हानाली पोटातुन! मी गडबडून आजीला वीचारलं," तीच्या पोटात बाळ कुठुन आलं?" तर ती देवाला नमस्कार करुन म्हणाली, "काय सांगू बाबा, देवाची करणी, आणी नाराळात पाणी."
सुमी ताई पण नारळ आहे हे मला माहिती नव्हतं. पण ती शाळेत असताना एकदा तीचा दादा तिल म्हैस म्हाणाला तेव्हां ती त्याच्यावर मांजरी सारखी फीस्कराली. मंाजर खूप मउ असते. ती सारखी म्याव म्याव करते आणी भय्याने आमच्यासाठी दीलेलं दूध पीते. मंाजरीला दूध आवडतं मला मंाजर आवडते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कट्टा
बंदुकीला गावठी भाषेत कट्टा म्हणतात. त्याचा उपयोग रस्त्याच्या कडेला उभा रहून चोरी करायला करतात. चोरी करणा वाइट. पण चांगला आनी वाईट ह्या संकल्पना मनासने बनाव्ल्या आहेत असा कोनी तरी थोरी मुनी सान्गून गेले. मुनी फार हुशार असत. आज काल ची हुशार मूला कट्ट्यावर वर उभ राहून टवालाक्य करतात. टवाळा आवडे िवनोद असे रामदास स्वामी म्हणून गेले. पण कोणता विनोद? खन्ना, मेहरा की काम्बळी ते नाही सांगीतलं. काम्बळी शेत्कार्याचे ठंडी पासून संरक्षण करते. ठंडी धगातून येते. धगाचा नल उघडला की पाऊस पडतो. नल ही एक अजब गोष्ट वस्तु आहे. नालाचा मुख्य उपयोग पाणी यावं म्हणून असतो. पण चळीतल्या नालाचा उपयोग शोभेची वस्तु म्हणून अथवा वस्तु तन्गायला खूंटी म्हणून करतात. अभ्यास करताना खुन्तिला शेंदी बंधाली की जोप येत नही. शेजर्च्या शेंडे काकू माला शाळेतून येताना रोज एक गोळी देतात. मी त्यांचा लड़का आहे. कािलया गब्बर चा लड़का होता म्हणून तो त्याला म्हानाला,"अब गोली खा". खतना आवाज करु नये असा बाबा म्हान्तात. मज़े बाबा शहाणे आहेत. ते घरी आले की कुनाशीही बोलत नाहीत. फक्त मधुनाच "हीक" असा आवाज कधातात. बाबांच्या बाबान्ना अजोबा म्हान्तात. पण आजोबा त्यांच्या बाबान्ना बाबाच म्हान्तात. काल मी झोपलो असताना अजोबा म्हानाले,"गाढवा सारखा लोळू नकोस." पण दुसर्या कुणा सारखा लोळ हे नाही संगीतले. आजोबंाचा भूगोल कच्चा आहे. गाढव लोलत नही, लाथा झाडत. झाडाला आम्बे लागतात. आम्ब्याला हीन्दीत आम म्हणतात. िहन्दी आपली राष्ट्र भाषा आहे. गांधीजी आपले राष्ट्र पीता होते. पण त्यांची मत्रू भाषा गुजराती होती. गुजराती मुली सुंदर असतात. त्यात्ल्या अर्ध्यांचा नाव शीतल असता. शीतल म्हणजे ठंडा. पण अमीर खान म्हन्तो ठंडा मतलब कोका कोला. कोला प्याय्ल्याने पोतातले जन्त मरतात. जन्त होणे चांगले नाही. माझी आई चांगली आहे. जय िहंद. जय महाराष्ट्र.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नाडी
नाडी दोनही मनगटान्वर असते. तशीच ती चड़्डीलाही असते. नाडी मुळे चड़्डी जागेवर रहाते. पण सुनील काकाच्या चड़्डीची नाडी सतत बाहेर लोम्बत असते. काकू म्हणते की त्यांच्या चड्डी ला नाडी ची गरज नही. वाढलेल्या पोतावर चड्डी तशीच अडकते. त्यांच्या शी लग्न करून मी पण अडकले. मी िवचार्ला पोटावर का? तर माला मार मीळाला. आजोबन्ना पडसे झाल्यामुले डोक्टरान्नी त्यान्न्ची नाडी दाखवायला संगीतली. सर्दी आणी नाडी चा सम्बन्ध आहे ही नवीन माहिती माला आज मीळाली. दोक्यावरून अन्घोळ केली की सर्दी होते असा आई म्हणते. पण नाही केली की उवा होतात असा ताई म्हणते. उवांचा त्रास फार वाईट. जहा िमले दो सर जुओंको मीला नया घर अशी एक जुनी जाहिरात होती. म्हणून माला एकदा रस्त्यत लेले सर आणी नेने सर दिसल्यावर मी विचाराला नवीन घर िमळाल का? तर त्यांनी मला टपली मारली. आज कल माला िपत्ताच्या तरसने अंगावर गांधी आल्या आहेत. म्हणून आई ने माला कोकम सरबत दिले. नोटेवर पण गांधी असतात. त्या कोकम सरबतात बुडवल्या की गांधी जातात का? आमच्या शेजारी राजेश गांधी रहातात. त्यांच्या अंगावर गांधी आल्या की ते काय करतात? िपत्ताचा त्रास वाईट. िशव्या देण पण वाईट असा माला गोरे मस्तारान्नी शिव्या देऊन समजवाला. गोरे मास्तर ह्यांचा फक्त अड्नाव गोरे आहे. पानधार्य शर्टात ते उठून दीसतात. सकाळी उठून फिरायला जाणे तब्ब्येती साथी चांगले. पण संध्याकाळ्च्या िफरणा्य्ला उनड्क्या म्हणतात. संध्या काळी आहे. पण ती म्हणते ितचा वर्ण गहू आहे. गव्हाचा पीठ गोरं होतं. पण ताई गोर्य पीथाच्या काळ्या पोळ्या करते. ताव्याचा रंग जतोय आज काल.

Comments:

There are 2 comments for पहीला उतारा - काही नीबंध